Home क्रीडा INS vs AUS सामन्यात पहिल्यांदाच दिसणार एक महिला अम्पायर !

INS vs AUS सामन्यात पहिल्यांदाच दिसणार एक महिला अम्पायर !

309
0

क्लेयर पोलोसाक (Claire Polosak) पहिल्यांदाच पुरुषांच्या टेस्ट मॅचमध्ये अम्पायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आज तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे.क्लेयर पोलोसाक (Claire Polosak) या पहिल्या महिला पहिल्यांदाच चौथ्या अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.याआधी क्लेयर पोलोसाक यांनी 2019 मध्ये नामीबिया आणि ओमानमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टूच्या सामन्यात अम्पायरिंग करण्याची संधी मिळाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणाऱ्या सिडनी कसोटी सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन ग्राउंड अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.

मैदानात नवा चेंडू घेऊन येणं, अम्पायर्ससाठी ड्रिंक्स घेऊन जाणं, टी आणि लंच ब्रेक दरम्यान पिचची देखरेख करणं यांसारखी काम चौथ्या अम्पायरच्या देखरेखीखाली करण्यात येतात. अशातच जर कोणत्याही कारणामुळे फिल्ड अम्पायर मैदानात उपस्थित नसतील तर त्यावेळी तिसऱ्या अम्पायरला मैदानावर अम्पायरिंगसाठी जावं लागतं. अशातच चौथा अम्पायर, तिसऱ्या अम्पायरची भूमिका साकारताना दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here