Home बीड मुख्याधिकारी यांना मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

मुख्याधिकारी यांना मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

587
0

वडवणी
वडवणी नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी व अभियंता यांच्यामध्ये काल रात्री झालेल्या फिल्मस्टाईल हाणामारी प्रकरणात मुख्यधिकारी यांनी अंभियात्यासह अन्य दोघा जणाविरुध्दात वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अभियंताचे वडिल देखील आरोपी आहेत.
वडवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी अभियंता सुमितकुमार दिलीपराव मेटे यांच्याकडे सोपविलेल्या प्रलंबित कामकाजा विषयी विचारणा केली असता त्यांनी उध्दटपणे वागून धमकी दिली आणि वडिल दिलीपराव मेटे व अन्य एक सुनिल कदम यांना कार्यालयात बोलवून घेतले व मुख्याधिकारी पाटील हे शासकिय काम करत आसताना अभियंताचे वडिल म्हणाले कि,माझ्या मुलाला काम का सांगतो तुला दाखवतोच असे म्हणुन सुनील कदम यांनी मुख्याधिकारी पाटील यांच्या गच्चुरीला धरुन कार्यालयाच्या बाहेर ओढत काढले व अभियंताचे वडिल दिलीपराव मेटे यांच्या हातातील स्टीलचे रोडने पाठीवर व खांद्यावर आणि दोन्ही पायाच्या मांडीवर आणि पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले व सुनिल कदम यांच्या जवळ असलेल्या चाकूने मुख्याधिकारी पाटील यांच्या उजव्या तळहातावर व अंगठ्यावर वार करुन गंभिर दुखापत करुन जखमी केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.म्हणुन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन संबधित अभियंता सुमितकुमार दिलीपराव मेटे यांच्यासह वडिल दिलीपराव मेटे व सुनिल कदम रा.बीड यांच्या विरोध्दात गु.रं.नं.05/2021 कलम 353, 332, 333, 109,120 ब, भांदवी नुसार वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असुन या घटनेचा आधिक तपास पोलीस उपनिरिक्षक परदेशी हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here