Home इतर परळीत होणार बेंच प्रेस प्रतियोगिता

परळीत होणार बेंच प्रेस प्रतियोगिता

253
0

डिएफसी जीमच्या वतीने ०३ जानेवारी रोजी आयोजन

परळी : राजस्थानी डिसेंट फिटनेस सेंटर अर्थातच डिएफसी जीमच्या वतीने परळीत बेंच प्रेस प्रतियोगिता आयोजित करण्यात आली आहे. दि.०३ जानेवारी रोजी नव्या वर्षानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

राजस्थानी डिसेंट फिटनेस सेंटर ही अद्ययावत अशी जीम परळीत गेल्या ३ वर्षांपासून कार्यरत आहे. व्यायामासाठीचे अद्ययावत उपकरणे, उत्तम प्रसिक्षक आणि संपूर्णत: वातानुकूलीत अशी ही जीम आहे. परळीकरांचा उत्तम प्रतिसाद गेल्या तीन वर्षांपासून या जीमला मिळत आहे. याच जिमच्या वतीने आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, बीड जिल्ह्यात प्रथमच बेंच प्रेस ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, नावनोंदणी 9767732843 या क्रमांकावर फोन करून नाव नोंदणी करता येणार असल्याची माहीती जिमचे संचालक सुरज बियाणी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here