Home औरंगाबाद सातव्या माळेला यात्रा भरण्याची ३०० वर्षांची पंरपरा

सातव्या माळेला यात्रा भरण्याची ३०० वर्षांची पंरपरा

8
0

तुळजा-रेणुका देवीच्या संयुक्त मंदिराला प्राचीन महत्व

मराठवाडा साथी न्यूज
जायकवाडी । पैठण-तुळजापूर व माहूरगड या दोन देवींचे मंदिर मुधलवाडी गावात पाहायला मिळते. तीनशे वर्षापूर्वीच्या या एकाच मंदिरात आसलेल्या तुळजामाता-रेणुकामाता देवीच्या दोन मूर्ती या परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. नवरात्रामध्ये सातव्या माळेला येथे दर्शनासाठी आल्यास नवस फलद्रुप होतो, अशी आख्यायिका आहे.

हेमाडपंथी सूबक बांधकाम आसलेल्या या प्राचीन मदिरासमोर महाकाय दीपमाळ आहे.कोरीव दगडी खांब व भरभक्कम छत मंदिरात समोर सभामंडप तर संरपच व गावकऱ्यांच्या प्रयत्नांने या मंदिराचा तिर्थक्षेत्रा मध्ये समावेश करण्यात आला आहे. या निधीतून या गावात विविध कामे करण्यात आली आहे .त्यामुळे हे मंदिर आकर्षक बनले आहे. गोविंद कुलकर्णी,उमेश कुलकर्णी, रवी कुलकर्णी हे या देवीची पुजा अर्चना तसेच नवरात्रातील विविध धार्मिक विधी पार पाडतात.मुधलवाडी येथील माजी आमदार भाऊ थोरात,संचालक भाऊ लबडे,तालुका प्रमुख आन्नाभाऊ लबडे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव समता परिषदचे उपजिल्हा प्रमुख अनिल जाधव ग्रामविकास अधिकारी अशोक आहेर संरपच काका बर्वे, उपसंरपच प्रकाश लबडे, माजर संरपच बाबासाहेब बोडखे प्रभुराम जाधव, एस एल जाधवसह गावकरी परीश्रम घेत आहे. नवरात्र उत्सव
उत्साहात साजरा केला जात आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणारई करण्यात आली आहे.

औरंगाबादहुन ४५ किलोमीटर अंतरावर तसेच दक्षिण काशी पैठणपासुन केवळ ७ किलोमीटरवर मुधलवाडी हे छोटेसे गाव आहे. तुळजा-रेणुका देवीचे संयुक्त मंदिर हीच या गावाची प्राचीन ओळख आहे. तीनशे वर्षापेक्षा अधिक काळापासून हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. माहुरगडाच्या रेणुका देवीचे व तुळजापुरच्या भवानी मातेचे उपपीठ असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here