Home अर्थकारण ९१ रुपयांचा टप्पा….

९१ रुपयांचा टप्पा….

270
0

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. पाच दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज(१३ जानेवारी) तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९१.०७ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८१.३४ रुपये प्रतिलिटर दर आहे. या अगोदर ४ ऑक्टोबर २०१८ रोजी, मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये प्रतिलिटर होता.राज्यातील परभणी येथे पेट्रोलचा दर सर्वाधिक ९३.४५ रुपये प्रतिलिटर व डिझेल ८२.४० रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहचला आहे. या अगोदर ७ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली होती. दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहारांमध्ये देखील पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here