Home बीड बीड जिल्ह्यात रविवारी ६२ बाधित; ६० रुग्णांची कोरोनावर मात

बीड जिल्ह्यात रविवारी ६२ बाधित; ६० रुग्णांची कोरोनावर मात

460
0

संदीप बेदरे l गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा आपले डोके वर काढले असून कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने जनता मोठ्या भयावह परिस्थितीमध्ये आहे. देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र पुन्हा दोन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतायुक्त वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील ३५९६ शिक्षकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील ३५ शिक्षक कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत तर ११२० शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
आज दुपारी प्राप्त झालेल्या १८१९ संशयित रुग्णांच्या अहवालांमध्ये १७५७ कोरोना निगेटिव्ह तर ६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये बीड ११, अंबाजोगाई १५ , आष्टी १९, माजलगाव २, परळी ५, शिरूर ५ , धारूर ४ तर पाटोदा तालुक्यात १ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आज ६० कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या चोवीस तासात ३ कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३,५४,३१५ संशयित रुग्ण आढळून आले असून यातील १,४८,१९६ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये १,३३,०६८ रुग्ण कोरोना निगेटिव्ह निघाले असून १५,१२८ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९३.१० % असून पॉझिटिव्हिटी रेट ११.४% तर डेथ रेट ३.१५ % आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४७७ तर इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंद असलेले ४ असा एकूण ४८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. गेल्या चोवीस तासात ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा डब्लिंग रेट १३९.७असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा प्रति रुग्ण रेशो २३.४३ आहे. जिल्ह्यातील १,४८,१९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यातील १,३३,०६८ रुग्ण निगेटिव्ह निष्पन्न झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.१० टक्के आहे. आरोग्य विभाग कोरोना व्हायरस सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याने कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तर मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशासह राज्यात सुरू झालेल्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाची दुसरी लाट रोखू शकतो. त्यासाठी नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.

११२० शिक्षकांचा जीव टांगणीला
जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांचे कोरोना अहवाल तपासण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील ३५९६ शिक्षकांनी स्वाब दिले असून यातील ३५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले असून ११२० शिक्षकांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार अंबाजोगाई तालुक्यातील ३७८ शिक्षकांच्या अहवालापैकी ९९ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आष्टी तालुक्यातील ४५० शिक्षकांच्या अहवालापैकी १२२ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून २ कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. बीड तालुक्यातील ४८२ शिक्षकांच्या अहवालापैकी १३२ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ६ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. धारूर तालुक्यातील २०१ शिक्षकांच्या अहवालापैकी ६७ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेवराई तालुक्यातील ५०३ शिक्षकांच्या अहवालापैकी १८२ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ७ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. केज तालुक्यातील २१४ शिक्षकांच्या अहवालापैकी ७३ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून २ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. माजलगाव तालुक्यातील ४०८ शिक्षकांच्या अहवालापैकी ८३ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. परळी तालुक्यातील ३२६ शिक्षकांच्या अहवालापैकी ११५ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. पाटोदा तालुक्यातील २५६ शिक्षकांच्या अहवालापैकी ६२ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. शिरूर तालुक्यातील २५८ शिक्षकांच्या अहवालापैकी १२६ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून ३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. वडवणी तालुक्यातील १२० शिक्षकांच्या अहवालापैकी ५९ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून अद्याप एकही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here