Marathwada Sathi

राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरु…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे चक्क दहा महिन्यानंतर राज्यातील पाचवी ते आठवीच्या विध्यार्थ्यांच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत.२३ नोव्हें.पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता.मात्र,कोरोनाची परिस्थिती बघता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने देण्यात आली होती.त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत.

दरम्यान,पालकांचे संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार असल्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत.तसेच,शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आले आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणेही बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग,ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचे पालन शाळांमध्ये करावे लागणार आहे.

Exit mobile version