Home औरंगाबाद अनधिकृत ५५ पुतळे हटविणार – पोलीस अधिक्षक

अनधिकृत ५५ पुतळे हटविणार – पोलीस अधिक्षक

15
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :
जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात ५५ अनधिकृत पुतळे उभारले गेले आहेत. ते पुतळे हटविण्याची कारवाई लवकरच करणार असल्याचे पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी स्पष्ट केले.

बर्दापूरला मंगळवारी अज्ञातांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना केली. त्यामुळे पुन्हा एकदा पुतळे आणि त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. अशावेळी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी ‘तरुणांनी पुतळे उभारण्यापेक्षा वाचनालय उभारावे’ असा सल्ला दिला. कोणत्याही महापुरुषांचा पुतळा बसवण्यासाठी जिल्हास्तरीय पुतळा समितीच्या मान्यतेशिवाय राष्ट्रपुरुष-थोर व्यक्तींचे पुतळे उभारता येत नाहीत. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पुतळे बसविले जात आहेत, असेही त्या म्हणाल्या. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात तब्बल 55 अनधिकृत पुतळे बसविले आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय यांना पत्र लिहून अशी माहिती देत योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

बंदोबस्तात काढू ते पुतळे : पाटील
यावर बोलताना मोक्षदा पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यातील अनधिकृत पुतळ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांना दिली आहे. तसेच अनधिकृत पुतळे जेव्हा तलाठी किंवा तहसीलदार काढण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना पोलीस बंदोबस्त दिला जाईल. आम्ही याप्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत. पण तरुणांनी पुतळे उभारण्यापेक्षा वाचनालय उभारावे, असे मोक्षदा पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here