मराठवाडा साथी न्यूज
परभणी : संबोधी अकादमी, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांच्या वाढदिवसानिमित्त २० डिसेंबर २०२० रोजी रमाबाई आंबेडकर नगर परभणी येथे संबोधी मित्रमंडळ महाराष्ट्र, सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे मित्रमंडळ, परभणी व ब्लु वारियर्स च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उदघाटक म्हणून बोलतांना विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.परभणी हे म्हणाले की, समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे यांनी मागासवर्गाच्या शिक्षणासाठी शाळा व स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून व्यवस्था करून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती केली.सद्य स्थितीत रक्ताचा तुटवडा असतांना राबविलेल्या या उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संबोधी अकादमी चे सचिव शेषराव जल्हारे म्हणाले की, भीमराव हत्तीअंबीरे यांच्या वाढदिवसाच्या दिनी तरुणांनी केलेल्या रक्तदान शिबीर आयोजन म्हणजे तरुणांचे क्रांतिकारी पाऊल असून तरुणांनी अश्या विविध विधायक कार्यात सहभागी व्हावे असे आव्हान केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भीमराव पतंगे, दि.फ.लोंढे, श्रीरंगराव हत्तीअंबीरे, सुधिर कांबळे,उत्तम गोरे,डॉ. अंकुश कुऱ्हे, गौतम साळवे,माधव मोते,अविनाश मालसमिंदर माजी सैनिक धिरज लहाने, हे उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना दि. फ.लोंढे म्हणाले की, हा वाढदिवस एका व्यक्तीचा नसून समाजातील कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा आहे आणि रक्तदान चळवळ परभणीत राबवणाऱ्या भीमराव हत्तीअंबीरे यांचा आहे.
सूत्रसंचलन नवनाथ जाधव यांनी तर आभार ज्ञानेश्वर हरकळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धभूषण हत्तीअंबीरे, शशिकांत हत्तीअंबीरे, बाबासाहेब भराडे, जगदीश हत्तीअंबीरे,नवनाथ जाधव, ज्ञानेश्वर हरकळ,अमित गायकवाड, राहुल कांबळे, शेख जावेद, राजेश काळे, अदिलीप पाटील, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले,अंकुश वानखेडे बालाजी भूसारे,शुभम अंभोरे, सतिश भालेराव, सुशांत अंभोरे, प्रीतम कठाळे, शिवदत्त अंभोरे, ऋषिकेश कांबळे, उत्कर्ष निकाळजे,विकास लहाने, वैभव सोनवणे, अशोक अंभोरे विशाल साळवे, अनिरुद्ध धरपडे आदींनी प्रयन्त केले.