Home इतर सरकारी बँकांना ४,८०० कोटींचा गंडा…!

सरकारी बँकांना ४,८०० कोटींचा गंडा…!

73
0

मराठवाडा साथी न्यूज

हैदराबाद : हैदराबादमधील एका कंपनीने बँकांना (स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, एक्झिम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया)चक्क ४ हजार ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचीमाहिती समोर आली आहे. सीबीआयने बुधवारी(३० डिसें)हैदराबादची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयवीआरसीएल आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक ई.सुधीर रेड्डी यांच्याव्यतिरिक्त सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक आर.बालारामी रेड्डी यांच्याविरोधात ४ हजार ८०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तपास यंत्रणांकडून कंपनी आणि आरोपींच्या ठिकाणांवर तपास करण्यात येत आहे.

दरम्यान,कंपनीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते न फेडून बँकांची फसवणूक केल्याचा आरोप सीबीआय कडून करण्यात आला आहे.या बरोबरच कंपनीवर अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंबंधीही आरोप करण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here