Marathwada Sathi

कार-ऑइल टँकरचा भीषण अपघात ४ जण जागीच ठार…!

मराठवाडा साथी न्यूज

गेवराईच्या झमझम पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात

० मृतांमध्ये वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगेंचा समावेश

० वाहकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाडर तोडून टँकरला धडकली

० धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक काही वेळ खोळंबली

बीड : औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघात होऊन चार जणांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. गेवराई शहराजवळील ही घटना घडली आहे. हा अपघात गुरूवारी (दि.२६) सकाळी आकार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात वंचित बहूजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृत्यू झाला. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.
भीषण अपघात

अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या धडकेत गंभीर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये मृतदेह अडकून पडले होते. शिवाय कारचा पुढील भाग दबून गेला. या अपघातानंतर महामार्गावरील वरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त कार ही रस्ता ओलांडून डिव्हायडर तोडून टँकरवर जाऊन आदळली.

Exit mobile version