Home क्राइम ‘आयएस’ च्या हल्ल्यात ३२ ठार,११० जखमी…!

‘आयएस’ च्या हल्ल्यात ३२ ठार,११० जखमी…!

586
0

मराठवाडा साथी न्यूज

बगदाद : इराकची राजधानी बगदादच्या वर्दळीच्या बाजारपेठेत गुरुवारी(२१ जाने.)झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटात ३२ जण ठार झाले असून ११० जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती तेथील अधिकाऱ्यांन मार्फत समोर आली आहे.देशात मुदतपूर्व निवडणुकीच्या नियोजनावरून निर्माण झालेला राजकीय तणाव आणि गंभीर आर्थिक संकट असताना मध्य बगदादच्या बाब-अल-शारकी या व्यावसायिक भागात हे हल्ले झाले.दरम्यान,या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे.या हल्ल्यात शिया मुस्लिम निशाण्यावर असल्याचे आयएसने म्हंटले आहे.

इराकच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराकमध्ये आयएसचा पराभव झाला असला तरी अजूनही त्यांचे स्लिपर सेल आणि समर्थक आहेत. दोन आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने परिसर रिकामा केला. भर बाजारात घडलेल्या या स्फोटानंतर सर्वत्र रक्ताचे सडे आणि मृतदेहाचे छिन्नविछिन्न तुकडे पडले होते. स्फोटातील काही जखमींची अवस्था गंभीर असल्याचे इराकच्या लष्कराकडून सांगण्यात आले. बगदादमधील सर्व रुग्णालये जखमींवर उपचार करीत आहेत.

दरम्यान,इराकच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार,पहिला आत्मघाती हल्लेखोर आजारी असल्याचे कारण देत बाजारात घुसला.तेथे गर्दी वाढल्यानंतर त्याने स्फोट घडवून आणला. तर, या हल्ल्यानंतर मृतदेह व जखमींच्या शेजारी लोक जमली असतानाच दुसरा आत्मघाती हल्ला झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here