बीड
आरोग्य विभागाला आज ५८३ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ५५१ जण कोरोना निगेटिव्ह तर ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड शहरातील आहेत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य
विभागाने कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे बंद केले आहे. ज्यांना त्रास होतो त्यांनी स्वॅब देणे हा अलिखित नियम पाडल्याने अनेकजण स्वॅब देत नाहीत. आज ५८३ संशयितांचे स्वॅब स्वाराती रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यामध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये बीड १२, अंबाजोगाई ७, वडवणी-शिरूर-आष्टी प्रत्येकी २, केज ३, तर धारूर, गेवराई, माजलगाव, परळी या तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.