Marathwada Sathi

घरांच्या मागणीत ३० % वाढ…


मराठवाडा साथी न्यूज


मुंबई
: मुंबईतील घरांच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदली गेलेली असताना भाडेकरारावर घर घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षांतील सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांशी तुलना केल्यास ही वाढ ३० टक्के अधिक असल्याचे दिसून येत आहे. यंदा डिसेंबरअखेपर्यंत ८० हजारांहून अधिक भाडेकरार नोंदवले. ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क अदा करून पुढील चार महिन्यांत नोंदणी करण्याची मुभा दिल्याने मुद्रांक शुल्कापोटी शासनाला भरपूर महसूल मिळाला. त्याच वेळी महसुलाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाडय़ाच्या घरांच्या करार नोंदणीतही लक्षणीय वाढ दिसत आहे.

मुंबईत डिसेंबर २२ हजार ४०० इतके भाडय़ाच्या घरांचे करार नोंदले गेले आहेत. प्रत्यक्ष नोंदणी झालेल्या करारांमध्येही वाढ दिसून आली आहे. ई-नोंदणीमुळे घरबसल्या भाडेकराराची नोंदणी होते. गेल्या डिसेंबर महिन्यात १५ हजार ५७२ भाडेकरार नोंदले गेले होते.
करोना काळातही ई-नोंदणीमुळे भाडेकरारांची नोंदणी आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर ते डिसेंबपर्यंत भाडेकरारांची चांगलीच नोंदणी झाली. आतापर्यंत ८० हजार ४२७ भाडे करारांची नोंद झाली असून ती गेल्या वर्षी ६० हजार २७ इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणत: ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातही तशीच परिस्थिती आढळून आली आहे. राज्यात आतापर्यंत ७४ हजार ४६२ भाडेकरारांची नोंद झाली असून ती गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ५१ हजार ७४० इतकी होती.

Exit mobile version