Home लाइफस्टाइल ‘काम मेहंदी का गैरों के काम आना है’

‘काम मेहंदी का गैरों के काम आना है’

8
0

दुसऱ्यांचे हात रंगविणाऱ्यांचेे आयुष्य लॉकडाऊनने झाले बेरंग
ग्राहक संख्या घटल्याने आली मंदी
कोरोनामुळे धंंदा बुडाला
मेहंदी काढणाऱ्यांची संख्याही घटली
प्रचलित दरांपेक्षा कमीने मिळणारे काम करतोय

प्रतिक्षा पगारे/श्वेता जटाले : मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले, तर काहींच्या व्यवसायावरही गंडांतर आले. मेहंदीच्या बाबतीत फिल्मी गाण्यात ज्या पद्धतीने ‘काम मेहंदी का गैराें के काम आना है’ तश्याच पद्धतीने दूसऱ्यांच्या हातावर रंग भरणाऱ्या मेहंदी कारागिरींचेे आयुष्य लॉकडाऊनमुळे ‘बेरंग’ झाले आहे.

दसरा-दिवाळीत मेहंदीची होती क्रेझ
नट्टापट्टा करायला कोणत्याही वयातील मुलीला आवडते. त्यात फक्त चेहराच नाही, तर मेहंंदीने हात रंगविण्यापासून ते नेलआर्ट करण्यावरही मुलींचा जोर असतो. तिच महेंदी लावण्यासाठी आता कुणीच इच्छुक नसल्याने हा व्यवसाय करणारे अडचणीत आले अाहेत. सध्या सगळीकडेच दिवाळी ची तयारी सुरु झाली आहे.दिवाळी नंतर लगेच लग्नसराई च्या तिथी आहेत .मेहंदीमुळे स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. फक्त एवढेच नाही तर मेहंदी मध्ये अनेक औषधी गुणतत्व असतात. त्यामुळे मेहंदीचा त्वचारोगावरही इलाज
म्हणून करतात.

मेहंदी आर्टिस्ट अडचणीत
मेहंदी आर्टिस्ट करून मेेहंदी काढून देण्यावर तरूणींचा जोर असतो. हे आर्टिस्ट औरंगपुरा,पैठण गेट इ. ठिकाणी मेहंदी काढून देतात.पण लॉकडाऊन लागल्यावर हे आर्टिस्ट कुठे होते?व आता पुन्हा सगळे नव्याने सुरु झाले आहे. तर काय त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व जाणून घेण्याकरीता ‘दै.मराठवाडा साथी’ ने औरंगपुऱ्यातील मेहंदी आर्टिस्टशी संवाद साधला.

ग्राहक घटले, उत्पन्नही आटले
मी आग्रा ला मेहंदी शिकलो आणि गेल्या ३,४ वर्षांपासून मी मेहंदी काढतो.बीड,परभणी,लासुर,जालना इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ऑर्डर्स घेतो.लॉकडाऊननंतर लगेच आम्ही आमच्या गावी गेलो. कारण, इथे कमविण्याचे दूसरे कोणतेच साधन आमच्याकडे नव्हते.आता लॉकडाऊन संपल्यावर नव्याने कामाला सुरुवात केली. मात्र,लोकांमध्ये कोरोनाची भीती अजुन गेलेली नाही. महिलांचे मेहंदी काढण्यासाठी येण्याचे प्रमाणही घटले आहे. मेहंदीला चांगला रंग यावा याकरिता ताज्या मेहंदी चाच वापर करावा लागतो. त्यासाठी एक दिवस अगोदरच मेहंदीची पाने कुटुन त्यांपासुन मेहंदी तयार करून ठेवतो. त्यानंतरच त्या मेहंदी चा वापर केल्या जातो.तसे आम्ही एका हातावर मेहंदी काढून देण्याचे ५० रु. तर दोन्ही हातावर मेहंदी काढून देण्याचे १०० रु. घेतो आणि दुल्हन मेहंदी काढून देण्याची १५०० पासून पुढे किंमत आहे.मेहंदीच्या डिज़ाइन नुसार त्यांचे पैसे आकारले जाते. पण सध्या ऑडर्स पण कमी मिळताय त्यामुळे कस्टमर दूसरीकडे जायला नको याकरिता कमी पैश्यांमधेसुद्धा मेहंदी काढून द्यावी लागते.
-सुजीत नायक, अजय नायक – प्रोफेशनल मेहंदी आर्टस, औरंगपुरा

हैदराबाद-मुंबईतून आणतो मेहंदी
कोरोनामुळे सर्व प्रथम आम्हाला आमच्या गावी जावे लागले.गावी जातांना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.तिकडे उदरनिर्वाह करण्याकरीता शेती सोडून दूसरे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते.त्यामुळे काही महीने शेती करुणच घर चालवावे लागले.लॉकडाऊन संपल्यानंतर औरंगाबाद मध्ये पुन्हा आल्यावर ग्राहकांकडून जो प्रतिसाद हवा आहे तो प्रतिसाद खुप कमी प्रमाणात मिळत आहे.सध्या लग्नसराईची तिथी नसल्यामुळे ऑर्डर खुप कमी झाले आहेत त्यामुळे रहायचा खर्च सुद्धा भागत नाही. कोरोनाच्या अगोदर आमच्या औरंगाबाद मधे ३ शॉप होत्या. मात्र, आता त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात आमचे खुप मोठे नुकसान झाले आहे.आम्ही ‘हिना’या मेहंदी चा वापर करतो. ही मेहंदी हैदराबाद आणि मुंबई वरुन मागवली जाते.मेहंदी तयार करतांना ४ ते ५ तास ती भिजवून ठेवावी लागते. त्यानंतर त्यामध्ये मेहंदीचे पावडर टाकून त्याला परत १ ते २ तास भिजवून ठेवावी लागते व शेवटी निज पेपर कैरीबॅगचा वापर करुन मेहंदी चा कोन तयार करण्यात येतो. एवढ करुन सुद्धा सध्या कामाचे पैसे निघत नाहीत.

  • दिपक, राज मेहंदी आर्टस,औरंगपुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here