Marathwada Sathi

देशभरात करोनामुळे २४ जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांचाही आकडा वाढला

देशात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. करोना संसर्गावर वेळीच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. करोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीनंतरही करोनाचे आस्ते कदम सुरूच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार १११ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, एकूण २४ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. करोनाच्या नव्या बाधितांसह मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने आरोग्य खात्यासमोरील आव्हाने अधिक वाढले आहे.

गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ९ हजार १११ नवे रुग्ण सापडले असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजार ३१३ झाली आहे. तर, ६ हजार ३१३ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये असून तिथे १९ हजार ८४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून राज्यात ५ हजार ९१६ करोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर, दिल्लीत ४ हजार २९७ अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांचा आलेख वर-खाली होत असताना मृतांचा आकडा मात्र वाढत जात आहे. गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या मृतांपैकी बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, तमिळनाडू येथे प्रत्येकी एक; महाराष्ट्रात दोन, दिल्ली, राजस्थान येथे प्रत्येकी तीन, उत्तर प्रदेशात चार तर गुजरातमध्ये सर्वाधिक सहा, अशी राज्यनिहाय मृतांची नोंद आहे.

नेहमीचा पॉझिटीव्हिटी रेट ८.४० टक्के आहे, तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९४ टक्के झाला आहे. सध्या रिकव्हरी रेट ९८.६८ टक्के आहे. आतापर्यंत ९२.४१ कोटी चाचण्या झाल्या आहेत.

Exit mobile version