Marathwada Sathi

२०२० यूजीसी नेट निकाल ‘जाहीर’…!

मराठवाडा साथी न्यूज

एनटीएने २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ‘यूजीसी नेट जून २०२०‘ ची परीक्षा घेतली होती.या परीक्षेत ५ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेसाठी नोंदणीकृत ८,६०,९७६ उमेदवारांपैकी केवळ ५,२६,७०७ परीक्षार्थीच उपस्थित राहिले.दरम्यान,२०२० चा यूजीसी नेट निकाल जाहीर झाला आहे. निकाल एनटीए वेबसाइट nta.ac.in वर उपलब्ध आहे.

यावेळी नेट परीक्षा (सीबीटी) संगणक पद्धतीने घेण्यात आली आहे. यात १२ दिवसांमध्ये ८१ परीक्षा घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. यावेळी एनटीएने ही परीक्षा संगणकवर आधारित ठेवली होती. सर्व प्रमुख विषयांसाठी अंतिम कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. आपण अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर जाऊन आपली कटऑफ देखील तपासू शकता.

Exit mobile version