Marathwada Sathi

शिक्षकाकडून २.३ लाखाची मागणी

पुणे :भूसंपादन केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी 2.5 लाख रुपये लाचेची मागणी लघु पाटबंधारे विभागातील एका अभियंत्याने केली होती. या अभियंत्याच्या वतीने लाच स्वीकारताना एका शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बारामतीत रंगेहाथ अटक केली.

अभियंता संदीप गोंजारी व त्याचा साथीदार शिक्षक प्रकाश सुर्यवंशी (वय 40) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा मोबदला म्हणून गोंजारी याने अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल करुन दाद मागितली. एसीबीच्या पथकाने माहितीची खातरजमा करुन सापळा रचला असता अभियंता गोंजारी यांच्या वतीने लाच घेताना शिक्षक प्रकाश सुर्यवंशी यांना रंगेहाथ अटक केली.

Exit mobile version