Home पुणे भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या तयारीत…!

भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या तयारीत…!

375
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेत पद मिळाले नाही म्हणून नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे.त्यामुळे हे १९ नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा वाढतच चालली आहे.त्यामुळे या नगरसेवकांचे हे बंड शांत व्हावे यासाठी भाजपचे नेतृत्त्व सतर्क झाल्याचेही लक्षात येत आहे.

दरम्यान,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितले की,या चर्चांमध्ये एक टक्काही सत्यता नाही.हा निव्वळ खोडसाळपणा आहे. नगरसेवकांच्या नाराजीचा आणि बंडखोरीचा कोणताही विषय भाजपमध्ये नाही. एकहाती सत्ता महापालिकेत आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे जाणीवपूर्वक हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here