Marathwada Sathi

सौदी अरामकोला १३ लाख कोटी रुपयांचा फायदा

छत्रपती संभाजीनगर:२०२२ हे वर्ष जगातील मोठ्या तेल कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरले आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत आलेल्या उसळीमुळे खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एक्सॉन मोबिलला ४.६० लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. पण, सौदी अरेबियाची सरकारी कंपनी सौदी अरामकोला सुमारे १३ लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कॉर्पोरेट इतिहासातील कोणत्याही कंपनीचा हा सर्वाधिक नफा आहे. इतर फायदेशीर तेल कंपन्या शेल, पेट्रोबास, शेवरॉन, इक्विनॉर, गॅझप्रॉम, पेट्रो चायना, टोटल एनर्जी आणि कोनोकोफिलिप्स आहेत. २०२२ मध्ये अपलला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वाधिक ८ लाख कोटी रु. फायदा झाला आहे.

Exit mobile version