Marathwada Sathi

शिक्षकांच्या बहिष्कारामुळे १२ वीचा निकाल रखडणार

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनांनी पुकारलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे राज्यातील बारावीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता . शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षेतील जवळपास 52 लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनाचे रखडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांसमोरही मोठं संकट उभं राहिलं आहे. या आंदोलनामुळे निकाल लागण्यास उशीर होणार असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणसाठीच्या प्रवेशासाठी अडचणी येणार आहेत.

शिक्षकांच्या आंदोलनामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. उशीरा निकाल लागल्यामुळे पुढे होणाऱ्या प्रवेशात विलंब होईल . आतापर्यंत 6 वेळा नियामकांच्या बैठक रद्द करत संघटनांनी बहिष्कार पत्र मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेली चर्चाही निष्फळ ठरली आहे. संघटनेसोबत चर्चा करण्यासाठी सुरुवातीच्या तीन अटी मान्य नाही, असे म्हणत त्यांनी चर्चा केली नसल्याने लाखो उत्तरपत्रिका मूल्यांकन कामांना स्तगीती आली आहे.

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी असलेल्या विना आणि अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासोबत आणखी अनेक मागण्यांसाठी या शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे केंद्रावंर पडून आहेत.

बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक आढळल्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतही चुका असल्याचे समोर आले. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळलेल्या आवस्तेत होते . मात्र इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुकीमुळे विभागीय शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Exit mobile version