Marathwada Sathi

तु माझ्या मृत पत्नीसारखे दिसते म्हणत 12 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग

‘तु माझ्या मृत पत्नी सारखे दिसते’ असे सांगत एका 50 वर्षीय व्यक्तीने घरा शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यात घडली असून याप्रकरणी अन्सार शेख (वय-50,रा.पुणे) या आराेपीवर बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली आहे.

याप्रकरणी आराेपी विराेधात पिडित मुलीच्या आईने पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी 2023 मध्ये घडलेला आहे. तक्रारदार व आराेपी हे एकमेकांचे घराशेजारी राहतात. आरोपीवर विनयभंग आणि पाेक्साे कायदा 8, 12 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या दिवशी मुलगी तिच्या राहत्या घरात एकटीच झाेपलेली असताना, आराेपी त्याठिकाणी हळूच आला. त्याने मुलीजवळ जाऊन तिच्याशी शारिरिक जवळीक साधली असता, मुलीने प्रतिकार केला. ती जाेरात आरडाओरड केली असता आरोपीने तिला शांत करण्यासाठी 20 रुपये देऊन, ‘ तुझे देख के मुझे मरे हुई बीवी की याद आ गई, लेकिन इसके बारे मे किसी काे बताना मत’ असे म्हणाला.याप्रकारामुळे मुलगी घाबरल्याने तिने संबंधित घडलेला प्रकार पालकांना उशीराने सांगितला. अखेर मुलीच्या पालकांना पाेलिसांकडे धाव घेत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस सपकाळ करत आहे.

Exit mobile version