Home क्राइम १२ वर्षीय मुलाचे धाडस…!

१२ वर्षीय मुलाचे धाडस…!

101
0

मराठवाडा साथी न्यूज

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मिरत येथे राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलाने धाडस करून आपल्या आईची हत्या करणाऱ्या आरोपीला पकडून दिल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मिरत येथे घडली आहे.याबाबत घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथे राहणाऱ्या महिलेचे गेल्या १४ वर्षांपासून जावेद नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सदर महिलेचा पती दिल्लीमध्ये नोकरी करतो. दरम्यान, मंगळवारी सदर महिलेचा प्रियकरअसलेला जावेद घरी आला. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले.भांडणात जावेद याने तिच्यावर चाकूने वार केला.त्यातच तिचा मृत्यू झाला.हा सर्व प्रकार मृत महिलेच्या १२ वर्षीय मुलाने बघितला.त्याने लगेच न घाबरता खोलीचा दरवाजा बंद केला आणि पोलिसांना फोन केला.

मिरत शहराचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले की, सूचना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.दरम्यान,आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here