Marathwada Sathi

११ वर्षाच्या मुलाने केला वडिलांचा ईमेल आयडी हॅक…!

मराठवाडा साथी न्यूज

लखनऊ : सायबर क्राईम ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.एका ११ वर्षाच्या मुलाने चक्क आपल्या वडिलांचा ईमेल आयडी हॅक करत १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे हा मुलगा युट्यूबवर हॅकिंग शिकला आहे.त्यानंतर त्याने आपल्याच वडिलांचा ईमेल आयडी हॅक केला. पोलिसांनी तपास केला असता धमकीचा मेल हा पीडित वडिलाच्या घराच्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात गाझियाबादच्या वसुंदरा कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला अचानक धमकीचा फोन आला.या मेलमध्ये १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.यासोबतच पैसे दिले नाही तर तुमचे अश्लील फोटो सार्वजनिक करु,तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जीवे मारु,अशी धमकी देण्यात आली.

दरम्यान,पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलाची चौकशी केली असता त्या मुलाने आपला गुन्हा कबूल केला.तसेच यूट्यूबवर आपण हॅकिंग शिकल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली या मुलाला काही दिवसांपूर्वी कम्प्युटर क्लासदरम्यान सायबर क्राईम म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे हे शिकवण्यात आले होते.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version