Marathwada Sathi

…तारखेपासून सुरु होणार दहावी-बारावीच्या परीक्षा…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोनाच्या संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.मात्र दहावी-बारावीची परीक्षा कधी होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.याच संदर्भात शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी खुलासा केला.बारावीची लेखी परीक्षा येत्या २३ एप्रिल पासून सुरु होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेतली जाईल,अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देत शिक्षणमंत्री म्हणाल्या की,परीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.तसेच बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे.तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान घेतली जाईल.

दरम्यान,कोरोना काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले.त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे,असेही वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.तसेच विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन देखील वर्ष गायकवाड यांनी केले आहे.

Exit mobile version