Home बीड कोरोनाकाळात १ लाख तरुणांना मिळाला रोजगार

कोरोनाकाळात १ लाख तरुणांना मिळाला रोजगार

526
0

बीड / कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग तसेच महास्वयंम वेबपोर्टल यांनी लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे आणि विविध उपक्रमांच्या आधारे ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण एक लाख १५ हजार ९२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात ३० हजार ५०० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण एक लाख ४८ हजार ३४३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने महास्वयंम वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.ऑक्टोबरमध्ये विभागाकडे ५५ हजार ८९० इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात २० हजार ७९३, नाशिक विभागात पाच हजार ३७५, पुणे विभागात १४ हजार ५७७, औरंगाबाद विभागात नऊ हजार ९१५, अमरावती विभागात दोन हजार ७१७ तर नागपूर विभागात दोन हजार ५१३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. याशिवाय ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३० हजार ५०० उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक १६ हजार ३४९, नाशिक विभागात एक हजार ४५८, पुणे विभागात ७ हजार ५६५, औरंगाबाद विभागात तीन हजार १०६, अमरावती विभागात एक हजार १४५ तर नागपूर विभागात ८७७ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here