Home क्राइम शिवसेना नेते यांच्या नावाखाली १.५ लाखाची खंडणी मागणार्यांना अटक

शिवसेना नेते यांच्या नावाखाली १.५ लाखाची खंडणी मागणार्यांना अटक

375
0


मराठवाडासाथी न्यूज

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे खंडणी घेणाऱ्या दोन आरोपींना मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सूरज निकम (वय 24 वर्ष) याला साताऱ्यामधून तर दुसरा आरोपी रोहित कांबळे (वय 19 वर्ष) याला मुंबईतून अटक करण्यात आली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.संदीप नावाच्या व्यक्तीने अंधेरीतील एमआयडीसी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली होती. नालासोपाऱ्यात विकी सिद्दिकी नावाच्या बिल्डरकडून घर घेण्यासाठी 18 लाख रुपये दिले होते. मात्र बिल्डरने घर न दिल्याने संदीप यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्याकडे मदत मागितली होती. यासाठी त्यांनी नितीन नांदगावकर यांच्या फेसबुक फॅन पेजवर आपला नंबरही दिला होता.आरोपींनी या फेसबुक फॅन पेजवरुन संदीप यांचा नंबर घेऊन त्यांना कॉल केला. आम्ही नितीन नांदगावकर यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच तुम्हाला मदत करु पण त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील असं सांगून त्यांनी संदीप यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त पैसे घेऊन नंतर मोबाईल नंबर बंद केला.नितीन नांदगावकर यांच्या नावाने आपल्याकडून पैसे उकळल्याचं लक्षात आल्यावर संदीप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली होती. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास करुन एका आरोपी सूरज निकम आणि रोहित कांबळे यांना अटक केली. या दोघांनी याधीही असे गुन्हे तर गेले नाहीत ना याचाही शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here