Marathwada Sathi

हम तब भी आपके साथ ही रहेंगे – नामदार भुजबळ

मराठवाडा साथी न्यूज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात नाशिकमधील कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. “राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत येत्या दोन वर्षांत सर्व इमारती बांधा, अशी कोपरखळी छगन भुजबळांनी मारली, त्याला लागलीच राज्यपालांनीही उत्तर दिलं. त्यावर राज्यपालांनी विचारले, तब तक क्या सिन रहेगा?भुजबळ म्हणाले, हम तब भी आपके साथ ही रहेंगे, या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर एकच हशा पिकला

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करून संपन्न झाले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते.

कोरोना से डटके सामना करो

कोरोना के भय से मत डरो, डटके सामना करो, असा सल्लाही राज्यपालांनी नागरिकांना दिला आहे. भारतीय पुरातन पॅथी, इम्युनिटी वाढविण्यासाठी गुणकारक आहे. याचं संशोधन आणी जनजागृती करावी. सोलर ऊर्जेवर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना, प्रोत्साहन दिलं. नरेंद्र मोदी यांनी सोलर ऊर्जानिर्मितीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिल्याचंही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अधोरेखित केले आहे.

खरा लीडर हा आपत्कालीन परिस्थितीत लक्षात येतो. मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आणि आग्रही भूमिका घेतली, ती खरंच कौतुकास्पद असल्याचंही राज्यपालांनी सांगितलं आहे.

Exit mobile version