Marathwada Sathi

सहारा अनाथश्रमातील मुलांचे आरोग्य धोक्यात !

मराठवाडा साथी न्यूज

गेवराई: तालुक्यातील पालख्या डोंगराच्या पायथ्याशी संतोष गर्जे या ऊसतोड मजुराने २००५ सालापासून अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले असुन शिक्षणापासून संसारापर्यंत सोय करण्या-या “सहारा अनाथालय” या ठिकाणी नव्याने नियमबाह्यपणे खडीक्रशरमुळे अनाथ मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  त्यामुळे जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने दिलेली मान्यता रद्द करण्यात यावी आणि नियमबाह्यपणे विज जोडणी देणा-या संबंधित महावितरणच्या आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यासह मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, ऊर्जा मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदन दिले आहे.

सहारा अनाथालयात शंभर अनाथ व जवळपास 30 स्वयंसेवक महिला व मुली वास्तव्यास आहेत या प्रकल्पाच्या विज जोडणी साठी १० लाख रुपये कोटेशन महावितरणने सहारा अनाथालयाकडुन भरून घेतले आहे.  या प्रकल्पातून इतरत्र विज जोडणी देण्यासाठी “आई संस्थेचे ना हरकत लागते, मात्र याठिकाणी महावितरणच्या आधिका-यांनी या अटीची पुर्तता न करता नियमबाह्यपणे खडीक्रशरला विज जोडणी दिली आहेत्यामुळे सहारा अनाथालयातील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 त्यामुळे जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने खडी क्रशरला दिलेली मान्यता तात्काळ रद्द करुन नियमबाह्यपणे विज जोडणी देणा-या महावितरणच्या आधिका-यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त, यांच्यासह मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे

Exit mobile version