Marathwada Sathi

सर्वधर्म समभावाची शिकवण जागाला विवेकानंदांनी दिली ‘प्राचार्य कमलाकर कांबळे ‘

अंबाजोगाई

येथील कृषि महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.१२ ते १८/०१/२०२१ या कालावधीत राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते.
युवकांनी स्वामी विवेकानंदाकडून विवेक आणि संयम यांची प्रेरणा घेऊन एक जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा तसेच युवकांनी धाडस करून नव्या दिशा, नव्या आशा आणि आकांक्षा यांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक विचारवंत व जेष्ठ समाजसेवक श्री नंदकिशोरजी मुंदडा व वनामकृवि परभणीचे माजी कुलसचिव, डॉ. दिगंबररावजी चव्हाण हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. दिगंबरराव चव्हाण यांनी प्राध्यापकांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करावे अशी उद्गार काढले. मा. नंदकिशोरजी मुंदडा यांनी बदलत्या हवामानात शेती पुढील आव्हानांना सामोरे जाऊन परस्पर सहकार्यातून आधुनिक शेतीचा उत्कर्ष कृषी विद्यार्थ्यांनी करावा अशी आशा व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय समारोपात कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, ताळेबंदीतही कृषी महाविद्यालय अंबेजोगाईचे प्राध्यापक,विद्यार्थी, अधिकारी , कर्मचारी व मजूर हे २४ x ७ कार्यरत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बसवलिंगआप्पा कलालबंडी यांनी मांडले, सूत्रसंचालन कवी राजेश रेवले यांनी केले तर आभार डाॅ. योगेश वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. अरुण कदम, डाॅ. सुनिल गलांडे, डाॅ. सुहास जाधव, डाॅ. नरेंद्र कांबळे, डाॅ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. विद्या तायडे,अनंत मुंढे, सुनील गिरी, भास्कर देशपांडे, यादवराव पाटील, सय्यद इरफान, , स्वप्निल शिल्लार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version