Marathwada Sathi

शेतात कापूस वेचणी करणार्या कष्टकरी महिलाना पोलीसाच्या धाकामुळे जीप चालकाने रस्त्यातच सोडले

मराठवाडा साथी न्युज

माजलगाव : कोरोनाच्या महामारी मुळे देशात गोरगरीब, कष्टकरी हातावर पोट असणाऱ्याचे बेहाल झाले असताना मजूर आखा पिळून गेला आणि नंतर लॉक डाउन शिथिल झाला. सद्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीची मजूर मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना मजुरांसाठी जीप, अटो, ट्रॅक्टर असे वाहन लावून कापूस वेचणी साठी आणावे लागतात. तर काल दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास परभणी फाट्यावर पोलिसांचा ताफा गाड्या पकडत होते तर गाड्या पकडत आहेत याची माहिती वाहन धारकांना कळताच पोलिसांच्या भीतीने वाहन चालकाने महिलाना व लहान मुलांना रस्त्यावरच सोडून पळ काढला आणि महिला,लहान मुले यांना घर गाठण्यासाठी अक्षरशः 3 ते 5 किलोमीटर पायी जावे लागले
सध्या शेतीचे कामे सूरु झाली आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना मजूर आणण्यासाठी वाहन लावल्या शिवाय पर्याय नाही. कापूस वेचणी साठी महिला मजूर याना गाडीत ने-आन करावी लागते आता मजूर आणण्यासाठी पोलिसांच्या भीतीने वाहन चालक मजुरांना ने-आन करण्यासाठी वाहन बाहेर काढावे का नाही अशी अवस्था वाहन धारकांची झाली आहे.

Exit mobile version