Marathwada Sathi

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कलावंतही मैदानात…!

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : कृषी कायदा हा सर्वसामान्यांशी कसा संबंधित आहे, त्या संदर्भात केंद्रातील मोदी सरकार कश्या पद्धतीने देशाच्या अन्नदात्याची टिंगल टवाळी करते आहे. त्याचे वार्तांकन करतांना देशातील माध्यमे त्याचे चित्रीकरण कसे कसे आहे? हे अतिशय चांगल्या पद्धतीने कलावंतांनी त्यांच्या कलाकृतीतून व्यक्त होत दाखविले आहे.

काही चित्रे अतिशय बोलकी आहेत

देशात गेल्या काही दिवसांपासून एक वेगळेच युद्ध सुरू आहे. त्यामध्ये प्रखर लोकशाहीवादी लोक आणि हुकूमशाही आणू पहाणे, असे हे युद्ध अनेक गोष्टींनी समोर येत आहे. मग ते अभिनेता सुशांतसिंग राजपुत अात्महत्या प्रकरण असो की अर्णब गोस्वामीच्या अटकेचे प्रकरण असो. त्यामध्ये हे युद्ध पहायला मिळाले. पण आता शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या युद्धाला सुरवात झाली आहे.

सोशल मिडियात त्याचीच चर्चा

ह्या चित्रातुन, सोशल मिडियातील पोस्टवरून ते स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे देशवासीयांमध्ये केंद्रातील सरकारविरूद्धचा रोष उफाळून येतांना दिसतो आहे. ही परिस्थिती आणीबाणी लावण्यासारखी होऊ शकते, असा काही तज्ज्ञ अंदाज व्यक्त करीत आहेत. त्यामुळे हे चित्ररूपी युद्ध अधिक गडद होण्याचीच जास्त शक्यता आहे.

Exit mobile version