Marathwada Sathi

बिबट्याचे कातडे, नखांची तस्करी

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई:
बिबटे, अस्वल तसेच अन्य वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे कातडे, नखे यांची विक्री करणाऱ्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने भांडुप येथून अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि अस्वलाची आठ नखे हस्तगत करण्यात आली. हे कातडे आणि नखे त्यांनी राजस्थान येथून आणल्याचे चौकशीतून समोर आले आहे.भांडुप पंपिंग बस तांब्याजवळ काही जण वन्य प्राण्यांची कातडे आणि नखे विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. श्रीधनकर यांनी सहायक निरीक्षक महेंद्र दोरकर यांच्यासह पथकाला सोबत घेतले आणि या परिसरात सापळा रचला. संक्रातीच्या दिवशी या ठिकाणी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.झडतीमध्ये त्यांच्याकडून सुमारे १४ लाखांचे बिबट्याचे कातडे आणि अस्वलाची आठ नखे हस्तगत करण्यात आली.

Exit mobile version