Home औरंगाबाद ट्राफिक पोलिसाला रिक्षाने नेले फरफटत;हायकोर्टाच्या सिग्नलवरचा प्रकार, पोलिस गंभीर जखमी…!

ट्राफिक पोलिसाला रिक्षाने नेले फरफटत;हायकोर्टाच्या सिग्नलवरचा प्रकार, पोलिस गंभीर जखमी…!

505
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षावर कारवाई करण्यासाठी तो रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतुक पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले आणि धक्का देऊन रस्त्यावर पाडले. हा प्रकार गुरूवारी (दि.26) सकाळी आकरा वाजता जालना रोडवरील हायकोर्टाच्या सिग्नलवर झाला. या प्रकारात ट्राफिक पोलिस हसीमोद्दीन गनोमोद्दीन शेख गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तर रिक्षाचालक फारुख शाह निसार शाह (रा. हिना नगर, चिकलठाणा) याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

गुरुवारी ट्राफिक पोलिस हसीमोद्दीन शेख सकाळी नऊ वाजेपासून हायकोर्ट सिग्नलवर कार्यरत होते. त्याच्यासह सहकारी नागोराव घुगे हेही तिथे होते. अकरा वाजेच्या सुमारास रिक्षा (एमएच20 इके0804) चालकाच्या शेजारे दोन प्रवासी आणि दोन असे प्रवासी घेऊन भरधाव येत होता. शेख यांना त्या रिक्षाला अडविले. यावेळी प्रवाशांना उतरवून शेख यांनी चालक फारुख शहा याला रिक्षा बाजूला घेण्याची सूचना केली. त्याच्या बाजूला तेही बसले. मात्र, शहाने शेख यांना फरफटत नेऊन रिक्षातून ढकलून दिले. परंतु, शेख यांनी रिक्षाच्या मागच्या पाईपला धरून ठेवले. फरफटत काही अंतरावर नेल्यावर रिक्षाचालक शाह याने वेग आणखी वाढविला त्यामुळे शेख रस्त्यावर पडले. यावेळी रिक्षाचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांचा पाय फॅक्चर झाला.

हा प्रकार घडला तेव्हा शेख यांचे सहकारी घुगे हे एन-४ कडे जाणाऱ्या रोडवर वाहतूक कारवाई करत होते. शेख हे रिक्षातून पडल्याचे पाहून एका कार चालकाने नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून रिक्षाचालक शाह याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रिक्षाचालक फारुख शाह याच्याविरुद्ध पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here