Marathwada Sathi

चांगली नोकरी देण्याचं आश्वासन देऊन तरुणीचा बलात्कार

गुरूग्राम : देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. अशात आता हरियाणाच्या गुरूग्रामधून अशी घटना समोर आली आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. इथे एका २० वर्षीय तरुणीला नोकरीसाठी एका तरुणाने घरी बोलावलं आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी तरुणीला ऑफिसमध्ये न बोलावता घरी बोलावलं. यानंतर तिला कोल्ड्रिंक पिण्याची ऑफर केली. तरुणीनेही त्याला होकार दिला. पण त्या कोल्ड्रिंकमधून नराधमाने तिला नशेचं औषध पाजलं. त्यांचं कौर्य इथवरच थांबलं नाहीतर तर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या बहिणीसोबत दिल्लीमध्ये राहते. ती मूळची मध्य प्रदेशची राहणारी आहे. पीडितेने पोलीस स्थानकांत घडलेल्या प्रकारासंबंधी तक्रार दाखल केली असून तिने दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या ओळखीचा मित्र निक्कीच्या माध्यमातून एका कंपनीच्या संपर्कात आली. यानंतर तिचं बोलणं बलजीत नावाच्या तरुणाशी सुरू होतं. बलजीतही तिचा २ महिन्यांपूर्वीचा मित्र होता.

बलजीतने पीडितेला चांगली नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी तू माझ्या घरीच ये. तिथूनच इंटरव्ह्यू होईल असंही त्याने तिला सांगितलं. नोकरीच्या गरजेमुळे तरुणी घरी गेली. पण तिथे तिच्यासोबत नराधमांनी सामूहिक अत्याचार केले. यासाठी तिला कोल्ड्रिंकमधून नशेचं औषधही दिलं. वासनेसाठी इतक्या खालच्या थराला आताची तरुणाई जात असल्याने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे.

Exit mobile version