Home राजकीय कसं जनता म्हणेल तसं….!

कसं जनता म्हणेल तसं….!

293
0

मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर:- राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी १,५२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. २०१९ मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील २० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. १७ पैकी १३ जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या ४ जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनल विजयी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here