Marathwada Sathi

“अजित पवार सरकारमध्ये आले तर..” अब्दुल सत्तारांचं वक्तव्य चर्चेत, मुख्यमंत्री कोण असणार तेही केलं स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपात येतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार हे शरद पवारांनाच विचारून निर्णय घेतील. ते सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

“अजित पवार हे शरद पवारांना विचारूनच जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. विरोधी पक्षात बसून टीका करण्यापेक्षा अजित पवार जर आमच्यासोबत आले तर यापेक्षा गोड बातमी कुठलीच असू शकत नाही. अजित पवार जर सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे.” असं सत्तार यांनी म्हटलं आहे.सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय येईल तो सर्वांसाठी अंतिम असेल. परंतु, ह्या ज्या राजकीय घडामोडी काय आजच घडत नाहीये अनेक दिवसापासून घडत आहेत. ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्या पाठीमागे आगळी वेगळी भूमिका असते.

अजित दादांचा आणि शरदचंद्रजी पवार साहेबांमध्ये पहिले दोघांमध्ये काय सुसंवाद आहे का वाद आहे? हा प्रश्न जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी बोलणं यामध्ये उचित होणार नाही. राजकारणामध्ये परिस्थिती उद्भवत असते आणि अशा परिस्थितीमध्ये कसं राजकारण होतं हे तुम्ही पहिले असेल असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आता अजित पवार यासंबंधी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आसमान में जैसा बारिश आती है, बारिश का कोई भरोसा नही, आदमी की सासो का कोई भरोसा नही, वैसा अभी राजकारण का कोई भरोसा नही अशी स्थिती झाली आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आणि मुख्यमंत्री ज्या गतीने या राज्यामध्ये काम करत आहे ते पाहता आम्हाला कुठलीही भीती नाही असंही सत्तार यांनी म्हटलं आहे

Exit mobile version