Home बीड साळेगावमध्ये विवाहितेचा निर्घृण खून!

साळेगावमध्ये विवाहितेचा निर्घृण खून!

8
0

कापासीच्या शेतात गळा आवळून हत्या

केज : कापूस वेचण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेचा गळ्यातील स्कार्पने गळा आवळून व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची क्रूर घटना केज तालुक्यातील साळेगाव शिवारात घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी पाटील यांच्यासह पोनि प्रदीप त्रिभुवन घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील साळेगाव येथील अश्विनी समाधान इंगळे (वय २८) ही महिला कापूस वेचण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात गेली होती.  त्यावेळी तिचा गळ्यातील स्कार्फने गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला. दरम्यान मरेकऱ्याने तिचा मृतदेह शेजारीच असलेल्या  कापसाच्या शेतात टाकला.  प्रेताच्या अंगावरील साडी बाजूला पडलेली होती. तसेच ब्लाउजची बटने व त्यावर घातलेले शर्टाची बटने तुटलेली आहेत. प्रेता जवळ दगड, स्कार्फ पडलेला असून प्रेतापासून काही अंतरावर वेचुन ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायतील एक बूट व दुसरा काही अंतरवावर कानातील एक दागिना हेअर पिन पडलेले आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरक्षक दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here