Home Uncategorized विद्यापीठ, महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार, ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य

विद्यापीठ, महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार, ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य

81
0

कोरोनामुळे सात महिन्यांपासून बंद असलेली विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये दोन दिवसांनी सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबर २०२० ते २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नवे शैक्षणिक वर्ष जाहीर झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषदेच्या गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

काेराेनामुळे २३ मार्चपासून लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. त्यामुळे विद्यापीठे, शैक्षणिक संस्था बंद केल्या हाेत्या. विद्यापीठांची वसतिगृहे १७ मार्च रोजीच रिकामी करून घेण्यात आली होती. ३० जूनपासून राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल करत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत परत बोलवले होते. मात्र शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालये अद्यापही बंदच हाेती. आता यूजीसीने १ नोव्हेंबरपासून विद्यापीठे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठात ५०% विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावता येईल.

– १ नोव्हेंबर २०२० ते २६ मार्च २०२१ दरम्यान प्रथम सत्राचा कालावधी – ८ ते २६ मार्च २०२१ दरम्यान प्रथम सत्र परीक्षा – ५ एप्रिल ते २१ ऑगस्ट २०२१ द्वितीय सत्र – ९ ते २१ ऑगस्ट २०२१ दरम्यान द्वितीय सत्र परीक्षा – २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्टदरम्यान सुट्या – शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ ची सुरुवात ३० ऑगस्ट २०२१ पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here