Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडवणी नगरपंचायत ताकदीने लढणार – भुजबळ,पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडवणी नगरपंचायत ताकदीने लढणार – भुजबळ,पवार

6
0

मराठवाडा साथी न्यूज, वडवणी :आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस ताकदीने लडणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल भुजबळ, युवकचे संतोष पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.
वडवणीकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या पाच वर्षापासून संघर्ष करत आहे. नागरिकांच्या मुलभुत गरजांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून वेळ प्रंसगी मोर्चे , आंदोलन केली आहेत. शहरातील पाणीप्रश्न असो, अथवा सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी संकुलनातील गाळयांची अनामत रक्कम कमी करण्याचा विषय असो, यासह नवीन नळ योजनेच्या जोडणी रक्कमेबाबत नागरीकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. शहर विकासाला चालणा मिळावी या उद्देशाने शहरातील रस्ते, पांढर वस्ती, सुदर्शन नगर, नवीन वस्ती, पावरलूम वस्ती, काळे वस्ती यासह इतर नगर परिसरातील विविध समस्याकडे लक्षवेधत वडवणीकरांसाठी प्रशासन दरबारी संघर्ष केला आहे.
नगरपंचायतीच्या अगामी निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकदीने लढण्यासाठी पक्षातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय राखण्यात येणार आहे. प्रसंगी पक्षाच्या विचाराशी सहमत होणाऱ्या इतर सहकाऱ्याणा सोबत घेऊन नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवणार असल्याचेही शहर राष्ट्रवादी काँग्रेस वतीने काँग्रेसच्या शहराध्यक्ष विठ्ठल भुजबळ यांनी जाहिर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here