Home Uncategorized मोटारसायकल चोरासह हद्दपारीतील आरोपी ताब्यात

मोटारसायकल चोरासह हद्दपारीतील आरोपी ताब्यात

93
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड : जिल्ह्यात मोटारसायकलच्या चोरीच्या वाढत असल्याने पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी दिलेल्या आदेशानंतर एलसीबी ने पथक तयार करून माहिती मिळवत मादळमोही ता गेवराई येथे छापा मारून चोरीच्या चार मोटारसायकलीसह आरोपीस ताब्यात घेण्यात आले त्याच बरोबर बीड शहरातील नाळवंडीनाका परिसरात हद्दपार असलेला आरोपी पकडण्यात आला .
एलसीबीचे पोनी भारत राऊत फौजदार गोविंद एकीलवाले तुळशीराम जगताप अशोक दुबळे प्रसाद कदम मनोज वाघ राहुल शिंदे सोमनाथ गायकवाड राजू वंजारे यांनी मोटारसायकल तरी प्रकरणाचा तपास करताना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे आरोपी असल्याच्या माहितीवरून छापा मारला असता सचिन धोंडीराम मेंडके याने चोरी केलेल्या मोटारसायकली जवळच्या पत्र्याच्या शेड मध्ये लपून ठेवल्या होत्या त्या ताब्यात घेत आरोपीला अटक करण्यात आली त्याने बीड व नगर जिल्ह्यातून या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले त्यातील एक मोटारसायकल बीड ग्रामीण पोलिसठाने हद्दीतील असल्याने आरोपीस ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले त्याच बरोबर उपविभागीय दंडाधिकारी यांनी शालिंदर रामेश्वर सौदा यास दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते मात्र आदेशाचे उलनघन करून तो नाळवंडी नका भागात फिरताना दिसल्याने त्याच्या विरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here