Marathwada Sathi

मुख्यमंत्र्यांनी केले अक्कलकोटच्या शेतकऱ्यांना धनादेशचे वाटप . . . . तर राजू शेट्टी यांनी केली शासनाकडे २५ हजार कोटींची मागणी.


आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी अक्कालकोटच्या रामपूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला . “तुम्ही सुरक्षित राहा ,तुमची काळजी शासन घेईल “अश्या शब्दात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूरग्रस्त शेतकऱ्याना एकूण ११ धनादेशचे वाटप करण्यात आले. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ २५ हजारांची मदत करावी अशी मागणी शासनाला केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचे जवळपास ५० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सरकारनं उशीर न करता राज्याने १५ तर केंद्राने ३५ हजार कोटींची देणगी द्यावी अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे.


जागतिक अन्न दिनानिमित्त आयुर्वेदाचार्य डॉ. मुकेश राठी यांच्याशी बातचीत


Exit mobile version