Home क्रीडा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा सोडणार …

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा सोडणार …

486
0


मराठवाडा साथी
मुंबई :
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेस येथे खेळल्या जाणाऱ्या चौथा कसोटी सामना होणार की नाही . दोन्ही संघ सध्या चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीवर आहेत. क्वीन्सलँडचे आरोग्यमंत्री रोज बेट्स यांच्या टीकेनंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) नाराज असून त्याचा आगामी सामन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय खेळाडूंना सर्व नियम पाळावे लागतील, जर तसे केले नाही तर त्यांनी ब्रिस्बेनला जाऊ नये. अशा टीकेमुळे टीम इंडियाची प्रतिमा खराब झाल्याचं बीसीसीआयला वाटत आहे. त्यामुळे पुढचे सामने खेळायचे की नाही याबाबत बीसीसीआय निर्णय घेणार आहे. ब्रिस्बेन कसोटीआधी काही भारतीय खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे खेळाडू नाखूष आहेत. क्विन्सलँड असेंब्लीचे सदस्य रोज बेट्स म्हणाले की, नियम पाळण्याची इच्छा नसल्यास भारतीयांचे स्वागत नाही. त्यामुळे आगामी सामना होणार की नाही याकडे लक्ष लागलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here