Marathwada Sathi

भटकंती करणाऱ्या घिसडी समाजाला वाली कोण?

विक्रमच्या कुटूंबाची व्यथा; शहर वस्तीतील शेकडो कुटूंब सुविधांपासून वंचित

बीड : शहरातील विद्यानगर भागात शेकडो घिसाडी समाजातील कुटूंब वास्तव्यास आहेत. या वस्तीला पिण्याचे पाणी,शौचालय आदी मुलभूत सुविधा नसल्यामुळे पोटासाठी लोखंडाला आकार देणाऱ्या घिसडी समाजाला वाली कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाच्या लोकाभिमुख योजनांपासून कोसो दूर असलेला घिसडी समाज शहरात काम नसल्याने ग्रामिण भागातील मांजरसुंबा याठिकाणी सध्या वास्तव्य करणा-या पवार कुटुबांची व्यथा दु:खदायक आहे.

बीड शहरातील भगवान पवार, त्यांची पत्नी रेखा  व मुलगा विक्रम सह काम धंदा करुन पोटाची खळगी भरण्यासाठी मांजरसुंभा येथे किरायाने रूम करून राहतात. मांजरसुंभा येथील चौकात विश्रामगृहासमोर त्यांनी शेतीची अवजारे बनवण्याचा कामधंदा सुरू केला आहे.

बीड शहरातील विद्यानगर मध्ये २५-३० वर्षापासून वास्तव्य करणा-या १००-१२५ घिसाडी समाजातील लोकांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही एवढंच काय मुलभूत सुविधा पिण्याचे पाणी, शौचालय नसलेल्या या समाजाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आमच्या

 समाजातील लोकांची अवस्था बिकट आहे. आम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. सध्या सर्व काही तयार अवजारे मिळत असल्याने आमच्या धंदावर सुद्धा मोठा परिणाम होतो आहे.

Exit mobile version