Home Uncategorized बँक अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत शेतकऱ्यांची हेळसांड!

बँक अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत शेतकऱ्यांची हेळसांड!

12
0

मराठवाडा साथी न्यूज, वडवणी ः वडवणी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत दत्तक ग्राम देवडी (ता.वडवणी) येथील शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. निष्ठुर बँक अधिकाऱ्यांमुळे ग्रामस्थांवर ग्रामीण बॅंकेसमोर आंदोलन छेडण्याची वेळ आली असून नागरीकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


State Bank of India

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्रामीण बँकेकडे बोटः गेल्या पंधरा वर्षापासून देवडी येथील शेतकऱ्यांचे खाती स्टेट बॅंकेच्या वडवणी शाखेत आहेत. त्यानुसार खातेदार शेतकऱ्यांना बँकेने कर्जही वाटप केले आहे. मात्र, यावर्षी अचानक बॅंकेने “तुमचे गाव एमजीबीने दत्तक घेतलेले असल्यानं तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली” सध्याच्या उदारीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या काळात ही भूमिका अनाकलनीय आहे. स्टेट बॅंक कर्ज देत नाही म्हटल्यावर , शेतकरी एमजीबीकडे गेले. तेथे नवीन खाते उघडले, पण नवीन खातेधारकांना कर्ज देता येणार नाही अशी भूमिका ग़ामीण बॅंकेने घेतली.. दोन्ही राष्ट्रीयकृत बॅंकांनी देवडीच्या शेतकरयांना े वारयावर सोडल्यामुळे अनेक शेतकरयांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आधार दिला आहे . महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने गाव दत्तक घेतलं आहे म्हणून जर स्टेट बँक कर्ज देत नसेल तर मग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने अनेक शेतकरयांना कर्ज दिले कसे ? याही पेथा राष्ट्रीयकृत बँक शाखांची मुजोरी व्यवस्थेला सुरूंग लावणारी आहे.

कर्जमाफीस पात्र शेतकरयांना कर्ज पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश असताना प्रत्यक्षात बॅंका मात्र, शेतकरयांची मोठ्या प्रमाणात अडवणूक करीत आहेत. ग्रामीण बॅंकेने कोणाला विचारून देवडी गाव दत्तक घेतले? गाव दत्तक घेतले असेल तर पात्र शेतकरयांची अडवणूक करण्याची मुभा बॅंकेला कोणी दिली? एखाद्या बॅंकेने गाव दत्तक घेतले असेल तर इतर बॅंकांनी त्या गावात कर्ज पुरवठा करू नये असा काही नियम आहे का? तसा नियम असेल तर एवढे दिवस स्टेट बॅंक देवडीतील गावकरयांना का कर्ज पुरवठा करीत होती? पंधरा पंधरा वर्षे खाते असताना स्टेट बॅंक तुम्ही तुमचे खाते बंद करून गा़मीण बॅंकेकडे जा असे कसे काय सांगू शकते, गा़मीण बॅंक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शेतकरी उपोषण करीत असतानाही वरिष्ठ त्यांना पाठिशी का घालत आहेत असे अनेक प्रश्न शेतकरी मिलिंद देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here