Marathwada Sathi

पिक नुकसानीच्या नैराश्येतून शेतकरी युवकाची आत्महत्या

मराठवाडा साथी न्यूज

वडवणी : मागील पंधरवाड्यात अतिवृष्ठीने शेतातील पिकांची प्रचंड नुकसान झाले, मयत वडिलांच्या ब°क खात्यावरील रक्कमही अधिकारी देईनात, त्यातच खरिप हंगामासाठी घेतलेले खासगी कर्ज फेडायचे कसे या विविंचनेतून देवडी (ता. वडवणी) येथील लक्ष्मण कोल्हे वय 29 वर्षे यांनी शनिवारी (दि.31) विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली .

 परतिच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हतातोंडाशी आलेला खरिपाचा घास हिराऊन घेतला. त्यातच अल्प व अत्यल्पभुधारक शेतकरी मोठ्या आर्थीक कोंडीत सापडला आहे. यंदा वेळेवर मान्सुम आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी कोरोना महामारीच्या संकटात खरिपाच्या पेरण्या केल्या. सुरवातीपासूनच समाधानकारक पावसामुळे खरिपाची पीकेही जोमात होती. मात्र, ऐन काढणीच्या टप्यातील शेती पीकांवर परितीच्या पवसाने अतिवृष्ठीच्या रूपात घाला घातला. देवडी (ता

 वडवणी) येथील लक्ष्मण कोल्हे (वय 29) यांच्या वडीलोपार्जीत जमीनीतील खरिप पीकाचे अतिवृष्ठीने प्रचंड नुसार झाले. दरम्यान,उसणवारी, खासगी कर्ज काढून मोठ्या आशेने खरिपाची मशागत केली. तसे पीकही जोमात होते, शेती उत्पादनांवर देणेदारी मिटवण्याच्या उद्देशाने लक्ष्मण कोल्हे यांनी काबाड कष्ठ उपसून पीकांची मशागत केली. पण नियतीला काही वेगळेचे मान्य होते. ऐन पिक काढणीच्या टप्यात परतिच्या मुसळधार पावसाने दानादिन उडाली. सततच्या मुसळधार पावसामुळे लक्ष्मण कोल्हे यांची शेत जमीनीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ला°कडाऊन कालावधीत आर्थीक अडचणींवर मात करण्यासाठी मयत वडीलांच्या ब°क खात्यावरील रक्कम मिळावी यासाठी लक्ष्मण कोल्हे यांनी आईसोबत ब°केच्या खेट्या घातल्या. अवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुनही ब°क अधिकाऱ्यांनी हक्काची रक्कम दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अतिवृष्ठीने खरिपाचा घास हिरावला त्यातच हक्काचे पैसेही बंकेतून मिळत  नाहीत देणेदारीसह वडीलांचे श्राध्द कसे घालणार या विवंचनेतून शनिवारी दि.31 दुपारी लक्ष्मण कोल्हे यांनी विषारी द्रव प्राशन केले. उपचारार्थ बीड येथील रूग्णालयात नेत असताना लक्ष्मण कोल्हे यांनी वाटेतच प्राण ज्योत मालावली.  रुग्णालयातील डाक्टरांनी तपासाअंती लक्ष्मण कोल्हे यांना मृत घोषीत केले.

Exit mobile version