Home औरंगाबाद पदवीधरच्या उमेदवारांची गोविंदभाईंकडे पाठ…!

पदवीधरच्या उमेदवारांची गोविंदभाईंकडे पाठ…!

525
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठवाड्याच्या सर्वागिण विकासासाठी झालेल्या चळवळीचे एकहाती तसेच निर्वविाद नेतृत्व ज्यांनी केले असे जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी गोविंदभाई श्रॉफ यांची आज पुण्यतिथी.मात्र त्यांच्या पुण्यतिथीचा त्यांनी स्थापन केलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेलाच विसर पडलेला दिसून येत आहे.फक्त एव्हढेच नाही तर पदवीधरच्या उमेदवारांनी देखील गोविंदभाईंकडे पाठ दाखवल्याचे दिसून येते आहे.

सरस्वती भुवन म्हणजे फक्त औरंगाबादेतलीच नव्हे तर मराठवाड्यातील एक ‘नामांकित संस्था’. तिची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली.आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या संस्थेचे नेतृत्व केले; मात्र आजही हि संस्था प्रामुख्याने गोविंदभाईंच्या नावानेच ओळखली जाते. १९६५ ते २००२ असा आपल्या आयुष्यातील तब्बल ३७ वर्षांचा कालखंड त्यांनी या संस्थेसाठी दिला. त्यांच्या पश्चात त्यांचे काही अनुयायी काही व्यावसायिक आणि काही कुटुंबजन आज संस्थेचे कारभारी झाले आहेत.मात्र हळूहळू कुठेतरी ते भाईंना विसरत चाललेत कि काय?असा प्रश्न पडतोय.फक्त एव्हढेच नाही तर स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेतही सारे काही आलबेल नाही आणि जनता विकास परिषद नेमके काय करत आहे याची माहिती मिळत नाही.या संस्था गोविंदभाईसाठी जीव की प्राण होत्या.मात्र आता गोविंद भाई यांच्या पुण्यतिथीला देखील या संस्थांना गोविंद भाईचा विसर पडत चालला आहे असे दिसून येते.

शिरीष बोराडकर,सतीश चौहान,संजय तायडे पाटील,रमेश पोकळे इत्यादींनि आता गोविंदभाई यांच्याकडे पाठ फिरवली आहे. असे म्हणायला हरकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here