Home Uncategorized दिवाळीपुर्वी कापुस खरेदी सुरू करा – भाई अ‍ॅड. गोले पाटील

दिवाळीपुर्वी कापुस खरेदी सुरू करा – भाई अ‍ॅड. गोले पाटील

409
0

मराठवाडा साथी न्यूज

माजलगाव: ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला असताना थोडेफार शिल्लक राहिलेला कापूस शेतकरी कसाबसा वेचून घरी आणत असताना त्यास विक्री करण्यासाठी शासनाची कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या घशात कष्टाने पिकवलेले पांढरे सोने घालत असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करतआहेत , त्यामुळे शासनाने नुसती नोंदणी नकोतर शासकीय कापूस खरेदी सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेकापचे नेतेभाई अॅड.नारायण गोलेपाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.
  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व पिके अवकाळी पावसाने वाहून गेली असून शेतकरी पूर्णता उद्ध्वस्त झालेला आहे सोयाबीन जागेवरच उगवले, बाजरीला झाडावरच कोंब फुटले, तुर पावसाने उधळून गेली, फुटलेल्या कापूसाच्या जाग्यावरच वाती झाल्या तर बोंडे सोडून गेली आशा परिस्थितीत शेतकरी पूर्णता कोल मोडून पडलेला असताना केंद्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला तयार नाही, राज्य सरकारने शेतकऱ्याला तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यासाठी दोन महिने लागणार आहेत, शेतकऱ्याने पिकावर भरलेला पीक विमा मंजूर करायला कंपन्या आणि शासन तयार नाही अशा परिस्थितीत थोडाफार राहिलेला कापूस शेतकरी वेचून आपल्या घरी घेऊन आला असताना त्यास विक्री करण्यासाठी कुठलीही शासकीय बाजारपेठ उपलब्ध नसल्याने खाजगी व्यापारी शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात लुट करत आहेत, शेतकरी कोलमडून गेलेला असताना देखील शासन कापसाची शासकीय खरेदी सुरू करायला तयार नाही ही बाब गंभीर स्वरूपाची असून शासनाने नुसते ऑनलाईन नोंदणी न करता तात्काळ तात्काळ कापसाची शासकिय खरेदी सुरू करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बांधावर अगळे वेगळे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रसिध्दीपत्रकाव्दारे शेकाप नेते भाई अॅड.नारायण गोले पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here