Home Uncategorized दबंग आमदार सुरेश धस यांची थेट खळवट लिंमगावच्या माजलगाव धरणपात्रात धाव

दबंग आमदार सुरेश धस यांची थेट खळवट लिंमगावच्या माजलगाव धरणपात्रात धाव

113
0

येत्या अधिवेशनात खळवट लिंमगाव येथिल पूल कम बंधाऱ्यासाठी विशेष बाब मांडणार – आ.सुरेश धस

वडवणी : वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या माजलगाव धरणाच्या नदीपात्राची पाहणी करण्यासाठी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार आ.सुरेश अण्णा धस यांनी काल बुधवार दि.४ रोजी दुपारी ३ वाजता घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना आधार दिला तसेच येत्या अधिवेशनात खळवट लिंमगाव येथिल हा पूल कम बंधाऱ्याचा विषय विशेष बाब म्हणून मांडणार असून या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी सरकार व प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथिल एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा गावातून शेतामध्ये जाण्याच्या रस्त्यामध्ये माजलगाव धरणाचे पाणी आहे. त्या तलावाच्या पाण्याच्या प्रवाहामधून होडीच्या साहाय्याने शेतकरी हे प्रवास करून आपापल्या शेतात जातात. त्याच होडीतून शेतातुन घरी वापस प्रवास करताना तेथील शेतकरी कुटुंबातील तीन व्यक्ती पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या माजलगाव धरणाच्या नदीपात्राची पाहणी करण्यासाठी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार आ.सुरेश अण्णा धस यांनी काल बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना आधार दिला. याप्रसंगी आ.सुरेश धस यांनी थेट धरणाचे नदीपात्र गाठत त्याठिकाणी वाहून गेलेल्या पडक्या पुलाची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, वडवणी तहसील प्रशासनाने या दुर्घटना प्रकरणी अत्यंत हलगर्जीपणा दाखवला आहे याचा मी निषेध करतो‌. मायनस ट्रेझरीमधून या दुर्घटनेतील लोकांच्या जिवीतहानीची भरपाई सरकारला तातडीने दुसऱ्याच दिवशी देता येत होती. परंतु तहसील प्रशासनाने याप्रकरणी कसलीही दखल न घेतल्याने खळवट लिंमगाव येथील गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर अक्षरशः अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनावरील आपला रोष व प्रचंड राग व्यक्त केला आहे. बहुधा येथिल तहसीलदार हे प्रभारी असल्याने त्यांना प्रशासनाविषयी व शासन निर्णयाविषयी माहिती नसल्याने जिल्हाधिकारी यांनी अशा प्रभारीला याठिकाणी ठेवलेच कसे? संबंधित मयताच्या वारसांना त्यांच्या अकाली मृत्यूनंतर चौदाव्या दिवशी खांदेकरी उतरविल्यानंतर व गोड जेवण झाल्यानंतर देखील जिवीतहानीच्या भरपाईचा धनादेश कुटुंबियांना मिळत नसेल तर हे सरकार ह्रदय नसलेलं सरकार आहे. या सरकारला ह्रदयच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. तसेच येथिल जो पूल कम बंधाऱ्याचा प्रश्न आहे याबाबत सपलीमेंटरीसाठी येणारे जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये खळवट लिंमगावच्या पूल कम बंधाऱ्याचा प्रश्न विशेष बाब म्हणून बुडीत क्षेत्रामध्ये बंधारा घेता येत नसला तरीसुध्दा पूल व पलीकडील बेट ही जी अवस्था आहे ही अवस्था अंदमान-निकोबार सारख्या बेटासारखी अवस्था ही झालेली आहे. ही अवस्था तात्काळ दूर झाली पाहिजे. पुनर्वसनासारखे सुध्दा साधे-साधे प्रश्न या गावचे अद्यापही सुटलेले नाहीत हे आमच्या सर्वांचे दुर्दैव आहे. सरकार सह आमच्या सर्वांचाच यामध्ये दोष आहे. या दुर्घटनेसाठी जे कोणी जबाबदार अधिकारी असतील त्या प्रत्येकावर थेट निलंबनाची कारवाई करत कठोर कारवाई झाली पाहिजे ही माझी मुख्य मागणी व भूमिका आहे. खळवट लिंमगाव येथील पूल कम बंधाऱ्याचा प्रश्न तसेच मयताच्या वारसांना जिवीतहानी भरपाई मिळावी याकरिता सरकार व प्रशासन दरबारी आपला पाठपुरावा सुरुच राहील असेही शेवटी आ.सुरेश धस म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते भारतदादा जगताप, बंडू नाईकवाडे, शेषेराव जगताप, हरी पवार, मच्छिंद्र झाटे, शिवाजी तौर, महेश शिंदे, बालासाहेब बादाडे, जालिंदर झाटे, अजय राठोड, भैय्यासाहेब वाघमोडे, गोविंद अंबुरे, जगदीश फरताडे, गोपाल बापमारे, महादेव फरताडे, भिकाजी चादर, सुंदरराव निसर्गंध, भागवत अंबुरे, जय श्रीराम सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here