Marathwada Sathi

तर, वाढू शकतात महिन्याला २५ लाख नवे कोरोना रुग्ण !

उत्सव आणि गर्दी ठरू शकते धोकादायक -केंद्र समितीचा इशारा

भारतात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. सध्या देशात ७५ लाख कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर १ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देशात सण -उत्सवाचा काळ सुरु आहे. त्यात या सणासुदीच्या निमित्ताने सूट दिल्यास कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने वाढू शकते. असा इशारा केंद्र सरकारच्या विशेष समितीने दिला आहे.कारण अश्या काळात नागरिक जास्त प्रमाणात बाहेर पडतात आणि अश्यावेळी सोशल डिस्टन्स पाळला जाईलच असे नव्हे , त्यामुळे या काळात विशेष काळजी आणि सोशल डिस्टंसिन्ग पाळले जाणे गरजेचे असल्याचे समितीने म्हटले आहे.

नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन समितीने केले आहे


जागतिक अन्न दिनानिमित्त आयुर्वेदाचार्य डॉ. मुकेश राठी यांच्याशी बातचीत

Exit mobile version